Congress Janjagaran Abhiyan : काँग्रेस नेत्यांचा गावकऱ्यांसोबत पंक्तित बसून जेवणाचा आस्वाद - MLA Ranjit Kamble
वर्धा - जिल्ह्यातील करंजी येथे काँग्रेसच्यावतीने जनजागरण अभियानाचा (Congress Janjagaran Abhiyan) शुभारंभ करण्यात आला. सेवाग्राम (Sevagram) लगतच्या करंजी (भोगे) या गावात जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रमाला काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), आमदार रणजित कांबळे (MLA Ranjit Kamble) उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी पंक्तीत बसून गावकऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. के सी वेणूगोपाल, एच. के. पाटील, नाना पटोले यांनी करंजी येथे मुक्काम केला.