यवतमाळमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे 'दे धक्का' आंदोलन
यवतमाळ - केंद्रातील मोदी सरकारच्या काळात दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरची दरवाढ वाढतच चालली आहे. सामान्य नागरिकांचे कंबरचे मोडले असून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी या सर्वांचे प्रचंड नुकसान या दरवाढीने झाले असे सांगत, कॉंग्रेसकडून सोमवारी (दि. 21 जून) पांढरकवडा येथे 'दे धक्का आंदोलन' करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही आपल्याकरिता मात्र पेट्रोल-डिझेल खूप महाग झाले आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तूंच्या किंमतीवर झाला. अत्यावश्यक असलेल्या घरगुती गॅसचे दरही साडे आठशे रुपयांवर पोहोचले आहे. सबसिडी नाममात्र उरली आहे. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने उज्ज्वला योजनेचा प्रचार केला. मात्र, आता ते घ्यायला सुद्धा नागरिकांना अडचण येत आहे. खाद्य तेलाचे दर सहा महिन्यांत दुप्पट झाले. शेंगा तेल, सोयाबीन तेलाचे दर वाढवण्यास आंतरराष्ट्रीय कारण आहे का? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. याचाच निषेध म्हणून हे आंदोलन असल्याचे आंदोलकांनी सांगितले
Last Updated : Jun 22, 2021, 11:25 PM IST