महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत, नागरिकांमध्ये उत्साह - Conclusion of Mahajanadesh Yatra nashik
आज (गुरूवारी) भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होतो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातून जवळपास अडीच ते तीन लाख नागरिक सभेला उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.