School Reopen in Gondia : गोंदिया जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट सुरू, पालकांमध्ये आनंद - गोंदिया शाळा सुरू
गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद होत्या. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शाळा सुरू होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या शाळा (School Reopen in Gondia) आजपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या गेटसमोर रांगोळी काढण्यात आली. त्याचप्रमाणे शाळेत येणाऱ्या मुलांना चॉकलेटी देण्यात आले. शाळेच्या गेटवरच सर्व विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती व सॅनिटाईझ करूनच वर्गात प्रवेश देण्यात आला.