यवतमाळ : नागरिकांवर लिकेज पाईपलाईनमधून पाणी भरण्याची वेळ
यवतमाळ - शहरात गटर लाइनचे भूमिअंतर्गत खोदकाम सूरू असल्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्यांच्या वॉलमधून पाण्याची गळती सुरु आहे. यामध्ये हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांना एकीकडे पाणी मिळत नसून जलवाहिन्यांच्या वॉलमधून पाणी भरण्याची वेळ आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये नारिंगेनगर, कमला पार्क, चांदोरेनगर, गिरजानगर व प्रभाग क्रमांक 4 व 5 मध्ये काही भाग ज्यात पिंपळगाव, विशाल नगर, राजर्षी शाहू नगर, गजानन नगर, रजनी पार्क, बालाजी पार्क, सुरभी नगर, दोनाडकर ले आउट, विश्वकर्मा नगर आदी भागात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्यजलवाहिनीचे वॉल्व लिक झाल्याने गळती सूरू आहे. नादुरुस्त जलवाहिनीमुळे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे, पाणीपुरवठा होत नसल्याने प्रभागातील नागरिकांचे बेहाल होत आहेत.