children day special : नऊ वर्षांची सौम्या बनली जगातील सर्वात लहान सितारवादक; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
अकोला - येथील सौम्या गुप्ता (Soumya Gupta) या नऊ वर्षाच्या चिमुकलीने वडिलांच्या मार्गदर्शनात सितारवादनाला सुरूवात केली. चिमुकल्या सौम्याला लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'चा (World Book of Records) जगातील सर्वात लहान 'सितारवादका'चा (youngest sitar player in world) बहुमान मिळाला आहे. तिने हे यश अल्पावधीतच गाठले आहे. या यशाबद्दल तिच्याशी बालक दिनानिमित्त संवाद साधला 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी... कोरोना काळात आपले अवघे जीवनचक्रच थांबले होते. या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकही घरीच होते. याच काळात या मोकळ्या वेळेत अकोल्यातील बिर्ला कॉलनी भागातील डॉ. अभिनंदन गुप्ता यांची नऊ वर्षीय चिमुकली सौम्या यापैकीच एक... डॉ. अभिनंदन गेल्या चार वर्षांपासून सितारवादन शिकत होते. चिमुकल्या सौम्यानंही आपल्या वडिलांसोबत सितार वादनाला सुरूवात केली. सौम्या ही अकोल्यातील माऊंट कारमेल शाळेची चौथ्या वर्गाची विद्यार्थीनी आहे. सौम्याने या दीड वर्षात सितारवादनाच्या शिक्षणात अगदी स्वत:ला झोकून दिलेय. हे करीत असतानाच तिने आपला अभ्यास आणि कथ्थक शिक्षण यात खंड पडू दिला नाही. अन् दीड वर्षातच तिने जागतिक स्तरावर आपले नाव कोरले आहे. तिच्या या यशाचा तिच्या वडिलांना शब्दांपलिकडचा अभिमान आहे.