महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

दिलासादायक! महागडा उपचार; मात्र, लकी ड्रॉमध्ये लागले 16 कोटींचे इंजेक्शन अन् वाचले प्राण - 16 crore injection in lucky draw

By

Published : Aug 3, 2021, 7:42 AM IST

Updated : Aug 3, 2021, 8:04 AM IST

नाशिक - येथील एका चिमुकल्याला एसएमए 1 हा दुर्मिळ आजार झाला होता. शिवराज डावरे असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याला त्याच्या या दुर्मिळ आजारासाठी लागणारे इंजेक्शन तब्बल 16 कोटींचे होते. लकी ड्रॉमध्ये त्याला ते लागले आणि त्याचा जीव वाचला आहे. वेळप्रसंगी आपल्या बाळासाठी आपल्या किडन्या देऊ पण खर्च भागेल का? असा प्रश्न त्याच्या पालकांना सतावत होता. मात्र, त्यांचे बाळ इतके काही नशीबवान निघाले की त्याला लागणारे 16 कोटींचे इंजेक्शन मोफत मिळाले. इतकेच नाही तर या इंजेक्शनवर लागणारा 6 कोटींचा करदेखील अमेरिकेतील डरबीन या कंपनीने केला. इंजेक्शन दिल्यानंतर आता शिवराजची प्रकृती सुधारत असल्याचे त्याचे वडील विशाल आणि आई किरण डावरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. पाहा, ईटीव्ही भारतने चिमुकल्या शिवराजच्या आई वडिलांची साधलेला विशेष संवाद.
Last Updated : Aug 3, 2021, 8:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details