'वेळ पडल्यास मेडिकल सेवाही बंद करू' कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा राज्यसरकारला इशारा - कोल्हापूर विकेंड लॉकडाऊन न्यूज
कोल्हापूर - राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने तीव्र विरोध केला आहे. आम्ही विकेंड लॉकडाऊनला सहकार्य करायला तयार होतो, मात्र आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत व्यवसाय बंद करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. शिवाय आमच्यावर सक्ती केल्यास आम्ही मग अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सेवाही बंद करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भातच चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्याशी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी बातचीत केली आहे.
Last Updated : Apr 6, 2021, 7:34 PM IST