Chandrakant Patil : माझ्यावर केंद्रीय नेतृत्त्व नाराज म्हणणाऱ्याला माझ्यासमोर आणा - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( State President Chandrakant Patil ) यांच्या केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावर स्वत: चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. ज्या सूत्रांनी सांगितले आहे, की केंद्रीय नेतृत्व माझ्यावर नाराज आहे आणि म्हणून मी सारखे दिल्लीला जात आहे. त्या सूत्राला माझ्यासमोर आणा. माझे श्रेष्ठी माझ्या बद्दल काय म्हणत आहे, हे मला माहित आहे. 42 वर्ष राजकारणात आहे. राज्यातील विरोधीपक्ष ( Opposition in The State ) म्हणून जी आम्ही काम करत आहोत, त्या कामगिरीवर आमचे श्रेष्ठी आमच्यावर समाधानी आहे. दिल्ली सूत्रातील बातम्यांचे सूत्र आमच्या पक्षातील असो नाहीतर बाहेरचे, त्यांना माहीत नाही पाटील क्या चीज है, मी घाबरत नाही, असा टोला देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.