महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Wine Sale Permission In Maharashtra : ...आता बसायलाही परवानगी द्या, चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारवर टीका - Chandrakant Patil

By

Published : Jan 28, 2022, 2:10 AM IST

पुणे - राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Chandrakant Patil's criticism of the state government) हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. (Wine Sale Permission In Maharashtra) १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सरकारच्या या निर्णयावर टिका होत असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील टिका केली आहे. ते म्हणाले एक दुर्दैवी निर्णय असून फक्त विकायला परवानगी नव्हे आता बसायलाही परवानगी दिली पाहिजे. जेवढा सत्यानाश राज्याचा करायचा आहे ते करा. हे शेवटचे अस्त्र आहे. अशी टिकाही पाटील यांनी यावेळी केली आहे. आयुष्यभर ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी काम केले अशा ज्येष्ठ लेखक समाजसेवक अनिल अवचट यांच्या निधनाच्या दिवशीच अशा पद्धतीचा निर्णय घेणे हे खूप दुर्दैवी आहे अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details