'काही दिवसात विदर्भात ऑक्सिजन अन् रेमडेसिवीरबाबतची परिस्थिती सुधारेल' - नितीन गडकरी बातमी
नागपूर - जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज वाढत असताना भिलाई येथून पुरवठा वाढला आहे. यासोबत ऑक्सिजनची पूर्तता होण्यास मदत होत आहे. यासह वर्ध्याच्या कंपनीतूनही रेमडेसिवीर उत्पादन सुरू होत आहे. यामुळे येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यक्त केली जात आहे. ते नागपुरात केटी नगर येथील सुरू करण्यात आलेल्या शंभर खाटांचे कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.