CCTV : रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला पोलीस शिपायाने वाचवले - policeman rescued woman
औरंगाबाद - सचखंड एक्सप्रेसखाली जाणाऱ्या महिलेचे प्राण पोलीस शिपायाने वाचवल्याची घटना मंगळवार औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर घडली. रेल्वे स्टेशनवरून सचखंड एक्सप्रेस निघाली त्यावेळी खाली उतरताना महिला रेल्वेखाली जात होती. त्यावेळी तिथून जाणाऱ्या GRP पोलीस शिपाई सतीश साळवे यांनी पळत जाऊन महिलेला वाचवले. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.