मादी बिबट्याने घरातील 'त्या' चार बछड्यांचे केलं स्थलांतर - नाशिक बिबट्या आणि बछडे न्यूज
नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो गावात डोंगराच्या पायथ्याशी राजेंद्र तांदळे यांच्या शेतातील घरात दहा दिवसांपूर्वी बिबट्याच्या मादीने आपल्या बछड्यांसाठी आसरा घेतला होता. तांदळे हे नेहमीप्रमाणे शेतातील घरी गेले असता, त्यांना घरात बिबट्यांचे चार बछडे आढळून आले. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजऱ्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले होते. ती मादी दररोज रात्री त्या घरात येत होती. मात्र, आता या मादी बिबट्याने आपल्या चार बछड्यांसह जंगलात स्थलांतर केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले हे दृश्य...