कुठे आनंद तर कुठे दु:ख; सीबीएसई परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी नाराज
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. बोर्डाच्या विविध परीक्षांच्या आयोजना संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पुणे शहरातील सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा देण्यासंदर्भात तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला, तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली. मागील वर्षभरापासून अभ्यास करत होतो, चांगले मार्क मिळतील याची खात्री होती. परंतु, अचानक परीक्षाच रद्द झाल्यामुळे थोडेसे वाईट ही वाटत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांशी संवाद साधला ईटीव्हीचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी...