महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती : 'गेल्या एक वर्षातील कारभार समन्वयानेच' - महाविकास आघाडी वर्षपूर्ती
नांदेड - गेल्या वर्षभरामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने समन्वय ठेवून वर्षभरात काम केले. कोरोनाच्या संकटातही महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. एकूण निधीपैकी 70 टक्के निधी हा आरोग्य विभागावर खर्च केल्यामुळे विविध विभागांना निधी कमी प्रमाणात मिळाला. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचाही समावेश आहे. यासह विविध प्रश्नांवर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तरे दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने मंत्री चव्हाण यांच्याशी संवाद साधला. पाहूयात, ते काय म्हणाले?