Union Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य करदात्यांसाठी निराशाजनक - सीए रोहन अचलिया - अर्थसंकल्प 2022 सीए रोहन अचलिया प्रतिक्रिया
औरंगाबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2022 (Union Budget 2022) सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पात वैयक्तिक करदाते आणि कंपनी करदात्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, असे मत सीए संघटनेचे अध्यक्ष रोहन अचलिया (CA Rohan Achaliya) यांनी व्यक्त केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांना काही सवलत मिळेल अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र, तसे झाले नसल्याने सर्वसामान्य करदाते नाराज झाले आहेत. तर क्रिप्टो करन्सीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये 30 टक्के कर हा लावण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे आरबीआय स्वतःची डिजिटल करन्सी आणणार आहे, हा एक मोठा निर्णय आहे असे रोहन अचलिया म्हणाले.