फटाकेमुक्त दिवाळी : काय म्हणतायेत व्यावसायिक? - फटाकेमुक्त दिवाळी व्यावसायिक प्रतिक्रिया
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली राज्यात सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबतीचा तयार करण्यात आलेला प्रस्ताव तयार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आपण आग्रही असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सांगितले आहे. बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन, सरकारने केले आहे. त्यामुळे फटाके विकले गेले नाही तर वर्षभर उदरनिर्वाह फटाक्यांचा व्यवसायावर असणाऱ्या विक्रेते संकटात सापडले आहेत. पाहूयात, याबाबत फटाके विक्रेते काय म्हणतायेत?