अर्थसंकल्पावर उद्योजक म्हणतात... - अर्थसंकल्प 2020
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 - 21 चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. यावर आर्थिक सल्लागार आणि उद्योजकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्थसंकल्प चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार? लांबच्या टप्प्यासाठी हा अर्थसंकल्प चांगला असला तरी जवळच्या टप्प्यात चांगला नसल्याची काही आर्थिक सल्लागारांनी सांगितले. लोकांच्या खिशात पैसा असेल तर ते खर्च करतील. असे झाले तरच आर्थिक उलाढाल होऊ शकते, असे सल्लागारांनी म्हटले आहे.