VIDEO: बंदी असतांनाही चंद्रपुरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन - चंद्रपुरातील शिवणीत बैलगाडा शर्यत
चंद्रपूर - बैलगाडा शर्यत आणि शंकरपट भरविण्यास बंदी असताना सिंदेवाही तालुक्यात मात्र बिनधास्तपणे अशा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी या गावात ही शर्यत भरविण्यात आली होती. या शर्यतीचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल झाला आहे. राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असतांना ही शर्यत पाहण्यासाठी उसळलेली गर्दी सर्व नियमांना धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे याच परिसरातील देलनवाडी येथे 7 दिवसांपूर्वी अशीच शर्यत रंगल्याची माहिती आहे. तर यासंदर्भात पोलीस तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.