महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

चंद्रपुरात भरली रेड्यांची झुंज; दरवर्षी भरवला जातो जीवघेणा खेळ - buffalo fight competition chandrapur

By

Published : Nov 5, 2021, 7:20 PM IST

चंद्रपूर - येथील नेहरूनगर वस्तीजवळील डब्ल्यूसीएल ओव्हरबर्डनजवळील मोकळ्या मैदानात आयोजित रेड्याच्या झुंजीला सोमवारी दुपारी मोठी गर्दी झाली होती. वळू (नर म्हैस) शिंग बांधण्याचा थरारक कार्यक्रम दरवर्षी एका विशिष्ट समुदायाद्वारे शहरात बली प्रतिपदेला साजरा केला जातो. या वादग्रस्त झुंजीसाठी मालकांनी रेड्यांना रंगीबेरंगी रंग देऊन सजवले आणि नंतर त्यांना दारू पाजली गेली. शर्यत खेळणाऱ्या रेड्यांना दिलेली दारू त्यांना आक्रमक बनवते. नंतर त्यांना मोकळ्या मैदानात आणले जाते आणि त्यांची झुंज लावली जाते. या रक्तरंजीत लढाईत हे पशु गंभीर जखमी होतात. त्यांना मोठी इजा होते. मात्र, तरीही ही झुंज सुरूच ठेवली जाते. राज्यात सर्वत्र अशा झुंजीवर बंदी असताना देखील नियम धाब्यावर ठेवत ह्या झुंजीचा उत्सव भरवला जातो. त्यावर मोठा जुगार खेळला जातो. सोमवारी किमान चार बैलांच्या झुंज झाल्या आणि शेकडो प्रेक्षक या थरारक कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. झुंजीत प्राण्यांना गंभीर दुखापत झाली. शहरात धार्मिक परंपरेच्या नावाखाली दोन दशकांपासून रक्तरंजित प्राण्यांचे खेळ सुरू आहेत. मात्र, पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details