VIDEO : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मिरजेत पार पडल्या म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा..
दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा मिरजेत पार पडल्या आहेत. तसेच यानिमित्ताने सजवलेल्या अनेक म्हैशी, रेडकू यांची मिरवणूक देखील निघाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या म्हैशींच्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरजेतील म्हैस पालन करणाऱ्या गवळी समजाकडून 1934 पासून म्हैस व रेडा यांची पाडव्याच्या दिवशी पूजन आणि म्हैस पळवण्याच्या शर्यती पार पडतात. मात्र कोरोनामुळे या परंपरेमध्ये खंड पडला होता. गेल्या वर्षांपासून घरीच म्हैस व रेडा यांचे पूजन करण्यात आले होते. पण कोरोना नियम शिथिल झाल्याने यंदा सामूहिक सगर पूजन पार पडले. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने गवळी समाजाने एकत्र येऊन लक्ष्मी मार्केट येथे प्रति वर्षीप्रमाणे सगर पूजन केले. तसेच यानिमित्ताने म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. ज्यामध्ये सुमारे 30 हून अधिक म्हैशी सहभागी झाल्या होत्या. रंगरंगोटी आणि सजवण्यात आलेल्या या म्हैसींची यानिमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून मिरवणूकही काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या म्हैशीं, रेडकू यांची निघालेल्या भव्य मिरवणूकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.