ईटीव्ही भारत विशेष : 'एसटी महामंडळाचा अर्थसंकल्प राज्य सरकारमध्ये अंतर्भूत करा' - एसटी बस न्यूज
मुंबई - एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती दोलायमान अवस्थेत आधीपासूनच होती. त्यात कोरोनाचे संक्रमण झाल्याने अधिकच भर पडली. आताच्या घडीला कामगारांचे पगार देण्यासाठीही एसटी महामंडळाला वणवण करावी लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा अर्थसंकल्पच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत करावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटना करत आहेत. याबाबत एसटी कर्मचारी व एसटी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...