बोरीवलीच्या घटनेवरून भाजपाचा दुटप्पीपण समोर आला आहे - सचिन सावंत - बोरीवलीत महिलेवर अत्याचार
मुंबई - बोरिवलीमध्ये भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे बघायला मिळाले होते. याप्रकरणात आता कॉंग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. 'महिलेने भाजपा खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली होती. मात्र, मदत मिळाली नाही. उलट त्या पीडित महिलेला मारहाण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणावरून भाजपाचा दुटप्पीपणा समोर आल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज बोरीवली पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.