मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन - मुंबई भाजयुमोचे आंदोलन
मुंबई - दक्षिण कोलकाताचे जिल्हाअध्यक्ष मुकुंद झा यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईद्वारे आज अंधेरी (पश्चिम) येथे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ममता बॅनर्जीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.