भाजपच्या कार्यकर्त्यांचे राज्यभरात आंदोलन - ओबीसी मुद्दा
मुंबई - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधनासभेत झालेल्या गोंधळामुळे महाविकास आघाडीच्या वतीने भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन करण्यात आले. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले. कांदिवली पश्चिम भाजप जिल्हाध्यक्ष कार्यालयाबाहेर भाजप नगरसेवक व पदाधिकारी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत या सर्व आमदारांचे निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा आंदोलन राज्यभर सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.