चंद्रकांत पाटलांनी पीपीई किट घालून परिसर केला स्वच्छ - सेवा संघटन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीपीई किट घालून कोल्हापुरात आज औषध फवारणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन सात वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर भाजपकडून सेवा संघटन हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून पीपीई किट घालून औषध फवारणीला सुरुवात केली आहे. शहरातील बेलबाग परिसरात त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.