VIDEO : राजेश टोपेंवर टीका करताना भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली - राजेश टोपे
राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आणि जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. महावितरण कंपनीकडून बळजबरीने होणारी वीजबिल वसुली थांबवावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली.