Goa BJP MLA Resigned : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या आमदाराने दिला आमदारकीचा राजीनामा - कुट्टळी आमदार
गोव्यात भाजपच्या कुट्टळी येथील आमदार एलिना साल्ढाणा ( BJP MLA Alina Saldanha Resigned ) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्या मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज होत्या. साल्ढाणा यांनी आज सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापती पाटनेकर ( Assembly Speaker Patnekar ) यांच्या सुपूर्द केला. साल्ढाणा यांना मागच्या काही दिवसापासून पक्षासह मंत्र्यांच्या कार्यक्रमात डावलले जायचे. पक्षाचे नेते पंचायत व वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो ( Transport Minister Mauvin Godinho ) व साल्ढाणा यांच्यात अंतर्गत वादही सुरू झाला होता. आपल्या समर्थकाला कुट्टाळी मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून गुडीन्हो प्रयत्न करत होते. त्यामुळेच साल्ढाणा मागच्या अनेक दिवसांपासून नाराज होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोडी चालू होत्या. भाजपने राज्यात चालवलेली पद्धत पाहून मी अतिशय दुःखी आहे, त्यामुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.