कागद दाखवा फासावरही जाऊ, कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं राज्य - प्रमोद जठार - प्रमोद जठार बातमी
रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथील गोळवली गावातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नारायण राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र, पोलिसांकडे कोणतही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला आहे. याठिकाणी कायद्याचं राज्य की गुंडांचं राज्य, असा सवाल उपस्थित करत अटकेचा कागद दाखवा अटक काय तर फासावरही जाऊ, असे जठार जठार म्हणाले.