मंत्री मलिक यांच्या नातेवाईकांचे अंडरवर्ल्ड अन आयएसआयशी असलेले संबंध पाच दिवसांत सिद्ध करणार - हैदर आजम - मलिक यांच्या नातेवाईकांचे अंडरवर्ल्ड अन आयएसआयशी असलेले संबंध
मुंबई -महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक भाजप नेते हैदर आझम (hyder azam) यांच्यावर ते बांगलादेशी नागरिकांचे नाव मतदार यादी नावे बदलून नोंदणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यावर उत्तर देताना हैदर आजम म्हणाले, राज्यात सध्या त्यांचीच सत्ता त्यांनी चौकशी करावी जर बांगलादेशी नागरिक आढळले तर त्यांना मी स्वतः बांगलादेशी सीमेवर सोडून येतो, असे म्हणाले. तसेच नवाब मलिक यांच्या नातेवाईकांचे अंडरवर्ल्ड व आयएसआयशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. ते म्हणाले, मलिक यांचे जावाई ड्रग्स पेडलर आहेत तर त्यांचा मुलाचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे अंडरवर्ल्डशी व आयएसआयशी संबंध असल्याचे मी पाच दिवसात सिद्ध करेन, असा दावाही हैदर आजम यांनी केला आहे.