Video : संपूर्ण देशातील लोकशाहीच्या डोळ्यात अंजन घालणारा निर्णय; आशिष शेलारांचे टीकास्त्र - आमदारांचे निलंबन रद्द
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या मागच्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केल आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी," सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता" असे म्हटले आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.