ST Worker Strike Issue : भाजपा नेते अनिल बोंडेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीका; म्हणाले... - एस टी कर्मचारी संपावरुन अनिल बोंडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
अमरावती - मागील अडीच महिन्यांपासून राज्यात एस टी कर्मचार्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. परंतु या आंदोलनावर अजूनही तोडगा निघाला नाही. दरम्यान या आंदोलनावरून भाजपा नेते अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फक्त आदित्य ठाकरे यांची तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पार्थ पवार यांची चिंता आहे, मात्र काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांची चिंता कोणालाच नाही, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. ते अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे बोलत होते.