महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जालन्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा दाखल, पंकजा मुंडे समर्थकांची भागवत कराड विरोधात घोषणाबाजी - भागवत कराड

By

Published : Aug 20, 2021, 12:47 AM IST

जालना - जालन्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली. ही यात्रा जालन्यात दाखल होताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच कराड यांना गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवले. तसेच भागवत कराड यांना गद्दार म्हणूनही संबोधण्यात आले. 'अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे, पंकजा ताई अंगार है बाकी सब भंगार है' अशी घोषणाबाजी समर्थकांनी केली. तसेच भगवान गडाशी गद्दारी करणाऱ्याचा निषेध असो, असं म्हणत गाडीतून जाणाऱ्या भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही कुणाच्याही सांगण्यावरून इथे आलो नाही, असंही या कार्यकर्त्यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details