Video : म्हापसा शहरात काँग्रेस उमेदवार पैसे वाटत असल्याचा भाजपाचा आरोप - goa election
पणजी - म्हापसा शहरात मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेस उमेदवार सुधीर कंडोळकर मतदानापूर्वी पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून काँग्रेस व भाजपा कार्यकर्ते आमने सामने आलेत. मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास काँग्रेस उमेदवार सुधीर कंडोळकर म्हापसा येथे काही घरात आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत फिरत असतानाची माहिती भाजपा कार्यकर्त्यांना मिळाली. सोबतच घटनास्थळी त्यांची गाडीही आढळून आली. दरम्यान या घटनेमुळे निवडणूक भरारी पथकाने चौकशी सुरू केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी कंडोळकर हे या वस्तीत येऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.