ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जालना - न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. त्यानंतर पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत .आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. आरक्षण पुर्ववत झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी करत जालना जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.