VIDEO : दाजीपूर अभयारण्यात भल्या मोठ्या अजगराचे दर्शन; दृष्य पर्यटकांच्या कॅमेरात कैद - दाजीपूर अभयारण्यात अजगर
राधानगरीतील दाजीपूर जंगल सफारी करत असताना काही पर्यटकांना भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाले. पर्यटकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये या अजगराचे दृश्य टिपले. खरंतर दाजीपूरमध्ये विविध पशू-पक्षांचे दर्शन होत असते. विशेषतः गव्यांचे मोठ्या प्रमाणात दर्शन होत असते. आज इतक्या मोठ्या अजगराचे दर्शन झाल्याने पर्यटकांना अजगराचे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करण्याचा मोह आवरला नाही.