कांदिवली पूर्व येथील अग्निशमन दलाच्या केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन - मुंबई ताज्या बातम्या
मुंबई - कांदिवली पूर्व येथे अग्निशमन दलाच्या केंद्राचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्निशमक दलाच्या भूमिपूजनाचे काही जण श्रेय घेत आहेत. पण आम्ही मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करत आहोत. जनतेला सुरक्षा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.