नांदेड जिल्ह्यात राबवणार कोरोना मुक्तीचा 'भोसी पॅटर्न'..! मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची माहिती - भोसी बातमी
नांदेड - जिल्ह्यातील भोसी हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. भोकर तालुक्यातील जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने कोरोनामुक्त गाव करण्याची किमया केली आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची दखल घेत कोरोनामुक्तीचा भोसी पॅटर्न जिल्हाभर राबवणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.