भिवंडी इमारत दुर्घटना : थेट घटनास्थळावरुन ईटीव्ही भारतचा आढावा... - भिवंडी बिल्डिंग दुर्घटना न्यूज
ठाणे - भिंवडीच्या पटेल कंपाउंड परिसरात सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जिलानी नामक इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या भयंकर घटनेत आता पर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी भेट देणार असल्याचेही स्थानिक पोलिसांनी सांगितले. या घटनेचा आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे यांनी...