पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवल्याने भीम सेनेचे आंदोलन मागे - RR Pandian
मुंबई - राज्य सरकारने सरकारी नोकरी आणि पदोन्नतीत एससी, एसटी समाजाला मिळणारे 33 टक्के आरक्षण रद्द केले होते. याविरोधात राष्ट्रीय भीम सेनेचे अध्यक्ष आर आर पांडियन यांनी आवाज उचला होता. या निर्णयाचा विरोध करत सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन पांडियन यांनी केले होते. अन्यथा भीम सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आता राज्य सरकारने या निर्णयावर स्थगिती आणल्यामुळे भीम सेनेने आपले आंदोलन मागे घेतले आणि राज्यसरकारचे आभार मानले. सरकारने या निर्णयात पुन्हा बदल केल्यास आम्ही आंदोलनाला तयार असल्याचे राष्ट्रीय भीम सेनेचे अध्यक्ष आर आर पांडियन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.