भास्कर जाधवांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - भास्कर जाधव बातमी
मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी सचिन वझे करत होते. त्यावेळी ते प्रकरण दाबण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच माझी खुली चौकशी करावी, आम्ही धमक्यांना घाबरत नसल्याचेही भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.