महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भारत बंदचा मुंबई शहरात जास्त परिणाम नाही; बँक व्यवहार सुरुळीत - mumbai bharat bandh news

By

Published : Dec 8, 2020, 12:42 PM IST

मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीत लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील विविध संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंदची हाक दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात याचा जास्त परिणाम दिसून आलेला नाही. खासकरून मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये जो बँकिंग जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी नेहमीसारखे बँकांचे व्यवहार सुरू आहेत. या परिसरामध्ये सरकारी व खाजगी बँकांची कार्यालये असून भारत बंदचा कुठलाही प्रभाव येथील व्यवहारांवर आढळून आलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details