साकीनाकातील निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे- भाई जगताप - Bhai Jagtap on Nirbhaya case
मुंबई - ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये दिल्लीमध्ये झालेला निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती मुंबईमधील साकीनाका या भागात घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी काळजीपूर्वक तपास करावा. जेणेकरून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली. गोरेगाव येथील पत्राचा येथे कृत्रिम तलावाची उद्घाटनानिमित्त भाई जगताप यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.