VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे भीक मांगो आंदोलन - एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय
पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST workers strike) सुरू आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. आता या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले असून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आलं आहे. राज्य सरकारने (state government) एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून राज्य शासनात या कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण झालेच पाहिजे. तसेच आमच्या मागण्या मान्य करा, अशी भूमिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...