video : शेतीच्या बांधावरून दोन गटात 'फिल्मी स्टाईल' हाणामारी - औरंगाबाद गुन्हे बातमी
औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात फिल्मी स्टाईलने हाणामारी झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 11 जुलै) दुपारच्या सुमारास घडली. यात सैन्य दलाच्या एका जवानालाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.