Ashadhi Wari : बंडातात्या कराडकर पायी वारी जाण्यावर ठाम; पंढरपूरकडे रवाना - बंडातात्या कराडकर बातमी
आळंदी/पुणे - श्री क्षेत्र आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्याला मोठ्या प्रमाणात पोलीसही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात वारकरी मंडळी यांनी टाळमृदुंगाच्या गजरात माउलींच्या पादुकांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने केले. मात्र, बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीला सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवून त्यांना थांबण्याची विनंती केली. मात्र, बंडातात्या पायी वारीवर ठाम आहेत.