बलिप्रतिपदा विशेष : 41 वर्षापासून येवल्यात केले जाते बळीराजाचे पूजन
येवला (नाशिक) - बलिप्रतिपदा या दिवशी येवला शहरात बळीराजाची मिरवणूक काढण्याची गेल्या 41 वर्षांपासून परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सध्या पद्धतीने बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून महाराष्ट्रात प्रथमता बळीराजाची मिरवणूक काढण्याची परंपरा ही येवला शहरापासून सुरूवात झालेली असून आजही ती अखंडितपणे चालू आहे. ईडा पिडा टळु बळीच राज्य येऊ दे... अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.