आरोग्य विभागाच्या पदभरतीवरून राज्यमंत्री बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर - बच्चू कडू ताज्या बातम्या
अमरावती - आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, तर आता २४ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षेत सुद्धा गोंधळ उडाला आहे. परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारलाच घरचा अहेर दिला.