Grand Welcome of Daughter Video : मुलगी झाल्याच्या आनंदात सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या सर्वांना वाटले गिफ्ट - गिफ्ट वाटून केले मुलीच्या जन्माचे स्वागत
कोल्हापूर - कोल्हापूरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळत असते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. इथल्या एका सराफ व्यापाऱ्याने आपल्याला मुलगी झाल्याच्या आनंदात कोल्हापूरातल्या सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुला मुलींना गिफ्ट ( Gifts felt after daughter birth in kolhapur ) वाटले आहेत आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे घरी जंगी स्वागत ( grand welcome of daughter in kolhapur ) केले. सुरज जाधव आणि केतकी जाधव असे या दाम्पत्याचे नाव आहे. जवळपास 100 बाळांना त्यांनी हे गिफ्ट दिले आहेत. दरम्यान, सुरज जाधव आणि केतकी जाधव यांना मुलगी हवी होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना मुलगी झाली त्याच्या आनंदात सामाजिक बांधीलकी जपत काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्या दिवशीच शहरातील सर्वच सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना बाळंतविडा सेट तसेच आदी वस्तू देऊन मुलीचे स्वागत केले.