पोलीस बनून वसईतल्या बहीण-भावाची कोरोनाची जनजागृती
वसई विरार - शहरात कोरोनाचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत आहे. बेजबाबदार नागरिक शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी सध्या वसईतल्या गर्दीच्या ठिकाणी दोन छोटे पोलीस फिरत असून कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. स्थानक परिसर किंवा भाजी मार्केट सारख्या गर्दीच्या ठिकाणी अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत.नागरिकांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे.वसई गावात राहणारे जीत व रीत वर्तक हे दोन चिमुकले बहीण भाऊ पोलीस बनून बाजारात फिरत आहेत. लॉकडाऊन होऊ नये यासाठी बाजारात नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. ज्यांनी मास्क घातले नाहीत अशा रिक्षावाले व फेरीवाल्यांना ते दम देऊन कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे चांगले कौतुक होत आहे.